Breaking News

माथेरानमध्ये प्रत्येक बुधवारी पाणीकपात

कर्जत : बातमीदार

पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये ऐन पर्यटन हंगामात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ठोस पाऊल उचलले आहे. आता प्रत्येक बुधवारी माथेरानकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

माथेरानची लोकसंख्या 4288 इतकी असून, वर्षागणिक येथे 10 ते 12 लाख पर्यटक येतात. त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. माथेरानला नेरळ कुंभे आणि येथील शरलोट डॅममधून पाणी पुरवठा होतो. शारलोट तलावात एकूण 148 दशलक्ष लिटर पाणी साठा होतो व या तलावातून दररोज 1500 लक्ष लिटर पाणी माथेरानमध्ये सोडले जाते.

सध्या शारलोट तलावात चार महिने पुरेल इतकाच पाणी साठा आहे. तलावाची पाणी पातळी राखली जावी व जलवाहिन्या  दुरुस्तीची कामे करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2019 पासून प्रत्येक बुधवारी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे  एमजेपीच्या अधिकार्‍यांनी माथेरान बाजारपेठमध्ये फलकाद्वारे नागरिकांना सूचित केले आहे.

मे महिना हा माथेरानमधील पर्यटन हंगामाचा प्रमुख महिना असतो. या काळात येथे पाणी टंचाई भासू नये, यासाठी दर बुधवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळेत नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा.
-किरण शानबाग, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माथेरान

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply