मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसर्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर दणदणीत विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. दक्षिण आफ्रिकेचा डाव 157 धावांवर गुंडाळल्यानंतर स्मृती मानधना आणि पूनम राऊत या दोघींच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने नऊ विकेट्स व 128 चेंडू राखून सामना जिंकला. या सामन्यात स्मृतीने एका विश्वविक्रमाची नोंद केली.
धावांचा पाठलाग करताना सलग दहा सामन्यांत अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड स्मृतीने आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही पुरुष किंवा महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. स्मृतीने हा पहिला मान पटकाविला आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …