Breaking News

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत स्नेहल माळीला कांस्यपदक

पनवेल ः वार्ताहर
पनवेल येथे सुरू असलेल्या 25व्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कांस्यपदक पटकाविले आहे. स्नेहल ही खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे.
या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्य, सेनादल, पोलीस, रेल्वे, बीएसएफ, बालेवाडी-पुणे, स्पोर्ट्स ऑथोरिटीज ऑफ इंडिया असे स्पर्धेक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्राकडून स्नेहल माळी (वय 14) हिने कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्राला पदक मिळवून देणारी पहिली कन्या होण्याचा मान स्नेहलने प्राप्त केला. याबद्दल तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे. स्नेहल यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply