Breaking News

कुस्ती स्पर्धेत पुनिया सुवर्णपदकासह जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी

रोम ः वृत्तसंस्था
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय मल्ल बजरंग पुनियाने मॅट्टेओ पेलिकोन मानांकन कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत 30 मिनिटांत जिंकून सुवर्णपदक पटकाविले. यासोबतच त्याने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान पुन्हा प्राप्त केले आहे.
65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीआधी मोंगोलियाच्या तुल्गा तुमूर ओशिरचे बजरंगविरुद्ध पारडे जड मानले जात होते, कारण आधीच्या दोन्ही लढतींत ओशिरकडून बजरंगने पराभव पत्करला होता. या अंतिम लढतीत 30 सेकंदांत बजरंगने बरोबरी साधली, परंतु अखेरचा गुण बजरंगने कमावल्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आले.
27 वर्षीय बजरंग 9 ते 11 एप्रिल या कालावधीत कझाकस्तानला होणार्‍या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याआधी त्याला राष्ट्रीय शिबिरात सरावासाठी दाखल व्हावे लागेल. या स्पर्धेआधी 65 किलो गटात बजरंग जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी होता. या स्पर्धेत 14 गुणांची कमाई करून त्याने अग्रस्थान मिळवले आहे.
बिगरऑलिम्पिक 70 किलो वजनी गटात विशाल कलिरमणाने कझाकस्तानच्या सिरबाझ तलगतचा 5-1 असा पाडाव करून कांस्यपदक पटकावले.
चार वर्षांच्या बंदीनंतर स्पर्धात्मक कुस्तीमध्ये पुनरागमन करणार्‍या नरसिंग यादवला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. कझाकस्तानच्या डॅनियार कॅसानोव्हने त्याचा 5-0 असा पराभव केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply