Breaking News

अफगाणी खेळाडूने रचला इतिहास कसोटीत ठोकले पहिले द्विशतक

अबुधाबी ः वृत्तसंस्था
अफगाणिस्तानचा 26 वर्षीय खेळाडू हश्मतुल्लाह शहिदीने शेख झायेद स्टेडियमवर सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले. या कामगिरीसह हश्मतुल्लाह अफगाणिस्तानचा द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. आपल्या कारकिर्दीतील पाचवा सामना खेळणार्‍या हश्मतुल्लाहने 443 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 200 धावांची खेळी साकारली. हश्मतुल्लाहच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने आपला पहिला डाव 4 बाद 545 धावांवर घोषित केला. विशेष म्हणजे अफगाणिस्तानची ही एका डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी अफगाणिस्तानने 2019मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एका डावात 342 धावा केल्या होत्या. हश्मतुल्लाहच्या आधी अफगाणिस्तानकडून सर्वोच्च धावसंख्या असगर अफगान याने केली होती. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत 164 धावांची खेळी साकारली होती. दरम्यान, अफगाणिस्तानकडून आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये तीन फलंदाजांनी शतक झळकावले आहे. हश्मतुल्लाह, अफगान आणि रहमत शाह हे ते तीन खेळाडू आहेत. रहमत शाहने 2019मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात 102 धावांची खेळी केली होती. तो अफगाणिस्तानचा पहिला शतक करणारा खेळाडू आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply