Breaking News

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी गुरुवारी (दि. 10) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, मनोज भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे आदी उपस्थित होते. ओबीसी समाजासाठी नेमण्यात आलेले विविध आयोग, त्यांच्या शिफारशी आणि ते लागू करण्यात आलेल्या अडथळे यावर या वेळी चर्चा करण्यात आली. यावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष गाते यांना दिले.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply