Tuesday , February 7 2023

ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचे कमबॅक

ब्राझीलिया ः वृत्तसंस्था
स्टार स्ट्रायकर नेमार कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलच्या आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. अनुभवी डिफेंडर थिएगो सिल्वा दुखापतीमुळे सध्या फुटबॉलपासून दूर असूनही त्याला ब्राझीलच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. ब्राझीलचे कोच टिटे यांनी कोपा स्पर्धेसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. रविवारी 13 जूनपासून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ब्राझील या स्पर्धेची मेजवाणी करणार आहे.
दक्षिण अमेरिकेतील विश्व कप क्वालिफायिंग स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आलेल्या बहुतांश खेळाडूंची कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चेल्सीचा डिफेंडर थिएगो सिल्वा याचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुकता नेमारने बोलून दाखवली होती. कोपा अमेरिका स्पर्धेत नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही स्पर्धेत खेळण्याची शक्यता धूसर झालीये. 13 जून ते 10 जूलै कोपा अमेरिका स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply