Breaking News

पनवेल महानगरपालिकेत जैवविविधता समितीची स्थापना

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती व जैवविविधतेची माहिती गोळा करून त्याचा उपयोग पर्यावरणाच्या रक्षणासाठी करण्यात येणार आहेच, शिवाय दुर्मिळ औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि खासदार श्रीरंग बारणे हे निमंत्रित सदस्य असणार आहेत पनवेल महापालिका क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता समितीची पहिली बैठक शुक्रवारी (दि. 12) महापालिका सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, महादेव मधे, नगरसेविका चारुशीला घरत, पुष्पा कुत्तरवडे, उपायुक्त विठ्ठल डाके, धैर्यशील जाधव, निमंत्रित सदस्य निखिल भोपळे, दिपाली मनमाडकर, अशोक गायकवाड व इतर सदस्य उपस्थित होते. या वेळी या समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली. आपल्या देशात अनेक ठिकाणी जैवविविधता आढळून येते. पर्यावरण रक्षणासाठी निसर्गाने त्याची निर्मिती केलेली आहे, पण अनेकांना त्याची माहिती नसल्याने मानवाकडून या ठेव्याचा नाश केला जातो. अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतीही परिसरात असतात, पण त्यांचा उपयोग माहीत नसल्याने त्या तोडून नष्ट केल्या जातात. न्यायालयाने पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्याचे जतन करण्याची जबाबदारी शासनावर टाकली आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर तसेच महापालिकास्तरावर जैवविविधता समिती स्थापन करून परिसरातील यासंबंधी माहिती गोळा करून त्यांचे रक्षण करण्याचे काम या समितीने करावयाचे आहे. याशिवाय एखाद्या औषधी वनस्पतीचे पेटंट घेणे व त्यामुळे या औषधी वनस्पतीपासून मिळणार्‍या उत्पन्नात आपला हिस्सा मिळू शकेल यासाठीही समितीने कार्य करावयाचे आहे.

अशी आहे जैवविविधता समिती : अध्यक्ष महापौर डॉ. कविता चौतमोल, सदस्य नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, महादेव मधे, अरविंद म्हात्रे, रवींद्र भगत, नगरसेविका चारुशीला घरत, पुष्पा कुत्तरवडे, सचिव (पदसिद्ध) विठ्ठल डाके, निमंत्रित सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, निखिल भोपळे, दिपाली मनमाडकर, अशोक गायकवाड, भगवान पाटील, देवचंद कोळी, संजय पाटील, रवींद्र पाचपुते, डॉ. सोमनाठा ननवरे, डॉ. सुनील नखाते, डॉ. किशोर वैद्य, महेश खामकर, प्रदीप घोसाळकर.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply