Breaking News

तळोजात उद्यानांचे लोकार्पण

तळोजा : सिडकोतर्फे तळोजे फेज-1मधील सेक्टर 2, 9 आणि 10 येथे नवीन उद्याने तयार करण्यात आली आहेत. या उद्यानांचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी  (दि. 23) करण्यात आले. या समारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर-तळोजा मंडल उपाध्यक्ष निर्दोष केणी, विनोद घरत, आशा बोरसे, कृष्णा पाटील, नंदू म्हात्रे, सुरज पोरजी, दिनेश केणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply