Breaking News

सायकल रॅलीला पनवेलमध्ये प्रतिसाद; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छतेचा संदेश

नवेल ः रामप्रहर वृत्त

येथील इन्फिनिटी फाऊंडेशन, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत आणि नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्दिष्ट स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विधाते, पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी मोहिते, मनपा मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, इन्फिनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष आयुफ अकुला, उपाध्यक्ष मुग्धा म्हात्रे, सरचिटणीस पवित्र शेरावत आदी उपस्थित होते. या सायकल रॅलीमध्ये पनवेल सायकलिंग क्लब, पुश अ‍ॅण्ड पेडल, पेडल सिटी, केकेसीसी व रनथोन क्लब यांनी सहभाग घेतला. यात 100 सायकलपटूंचा समावेश होता. रॅलीला पनवेल महापालिकेच्या कार्यालयापासून सुरुवात झाली आणि आदई जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी समारोप झाला. सहभागी क्लबना सन्मानचिन्ह देऊन व सर्व सायकलपटूंना पदक व चषक देण्यात आले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply