Breaking News

नामदेववाडीतील नागरिकांना नुकसानभरपाई तसेच योग्य पुनर्वसन करा

आमदार महेश बालदी यांची सिडकोकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
वडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्‍या नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घरांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालकांकडे केली आहे.
या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सिडकोला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडघरमधील नामदेववाडी येथील 14 घरे पूर्वीपासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. सध्या या परिसरात सिडकोमार्फत भरावाचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान होते.    
आमदार प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना नागरिकांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन होण्याकामी बैठका झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पुनर्वसन करण्याबाबत सिडको सकारात्मक होती, तसेच त्याबाबत सिडकोकडून कार्यवाहीसुद्धा सुरू होती, परंतु मधल्या काळात या संदर्भात सिडकोच्या विभागाकडून पुढील कार्यवाही करण्यात आली नाही. त्या कार्यवाहीला गती द्या, असे नमूद करून वडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्‍या नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन पावसाळ्यापूर्वी त्यांच्या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केली आहे.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply