Breaking News

‘त्या’ वेबसाइटवरील जातीवाचक गावांची नावे बदलण्याची मागणी

पनवेल : जातीवाचक गावांची अथवा वस्त्यांची नावात फेरबदल करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र तरीदेखील http://raigad.govt.in in या शासकीय वेबसाईटवर अनेक वस्त्यांची, गावांची नावे अद्यापही जातीवाचक असल्याने स्पष्ट दिसून येत आहेे. त्यामुळे जिल्ह्याच्या नकाशावरील या नावांमध्ये तत्काळ फेरबदल करण्याची मागणी आंबेडकरी लोकसंग्राम संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना लिहलेल्या पत्रात केली आहे. या वेबसाईटवर अद्यापही जिल्ह्यात अनेक गावात हरिजनवाडी, कुंभारवाडा, आदिवासी वाडी, चांभार वाडी, महारवाडा असा उल्लेख स्पष्टपणे दिसून येत आहे. शासकीय स्तरावर या आदेशाची त्वरित अमलबजावनी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वसामान्यदेखील  जातीवाचक नावांचा उल्लेख टाळण्याचा प्रयत्न करेल. याबाबत लवकरात लवकर वेबसाइटवर तांत्रिक दुरुस्ती करून शासनाने काढलेल्या आदेशाची अमलबजावजी व्हावी, असे मत डॉ. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले आहे. 

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply