Breaking News

पनवेलचे सखी मतदान केंद्र, सेल्फी पॉइंट लय भारी

पनवेल : नितीन देशमुख 

निवडणूक मग ती कोणतीही असो मतदानासाठी कोणत्याही मतदान केंद्रात प्रवेश करताच दरवाज्यावर पोलीस आणि आत चेहर्‍यावर खूप टेन्शन असलेले निवडणूक कर्मचारी, राजकीय पक्षांचे पोलिंग एजंट आणि  बाहेर मतदारांची रांग हे नेहमीचे दृश्य,  पण या वेळी प्रत्येक विधानसभा

मतदारसंघात सखी मतदान केंद्र ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्याप्रमाणे पनवेल विधानसभा मतदारसंघात व्ही. के. हायस्कूलमध्ये सखी मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी नेमण्यात आले होते. या मतदान केंद्रात प्रवेश करताना रंगीबेरंगी फुग्यांच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. छताला रंगीत झिरमिळ्या, समोरच देश का महात्योहार, मला अभिमान आहे मतदान केल्याचा, मी मतदान केले तुमचे काय?, अशा प्रकारचे फलक लावण्यात आले होते. बसण्याकरिता बैठकव्यवस्था होतीच, पण बाजूला सेल्फी पॉइंटही उभारण्यात आले होते. येथे उभे राहून मतदान करून आलेले मतदार सेल्फी काढण्यात दंग होते. या सखी मतदान केंद्रात केंद्राध्यक्षही महिलाच होती. मतदान केंद्र अधिकारी 1 व 2 म्हणूनही महिलाच व शिपाई म्हणूनही महिला कर्मचारीच होती. अनेक जण या मतदारसंघात नाव नसतानाही हे मतदान केंद्र पाहण्यासाठी या ठिकाणी येऊन सेल्फी काढत असल्याचे दिसत होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply