पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त वेशभूषा, चित्रकला आणि तक्ता बनविणे (पोस्टर मेकिंग) या ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा तालुकास्तरीय असून, मराठी माध्यमाकरिता आहेत.
पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात थोर पुरुष थोर महिला, आपल्या समाजातील मदतनीस, आवडती कार्टून व्यक्तीरेखा हे विषय आहेत. अधिक माहिती तसेच लिंक पाठविण्यासाठी मंजिरी धोत्रे (9004032075) यांच्याशी संपर्क साधावा.
इयत्ता पहिली ते दुसरी अंतर्गत चित्रकला स्पर्धेसाठी वाढदिवस साजरा करणे, माझे आवडते घर, फुलपाखरू, कार्टून अशी चित्रे काढून ती पाठवायची आहेत. यासाठी युवराज धनवटे (9220250065) यांच्याशी संपर्क साधावा.
तक्ता बनविणे (पोस्टर मेकिंग) स्पर्धा इयत्ता तिसरी ते चौथीसाठी आहे. यात कोविड-19विषयी जागरूकता, पाणी वाचवा पृथ्वी वाचवा, स्वावलंबी भारत, मुलगी वाचवा मुलगी शिकवा असे विषय आहेत. या संदर्भात पंढरीनाथ जाधव (8692820086) यांच्याशी संपर्क साधावा.
18 ते 22 मार्च या कालावधीत होणार्या या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सीकेटी मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी केले आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …