Breaking News

खारघरमध्ये भाजपतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा खारघर-तळोजा मंडळाच्या   वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवारी (दि. 14) जागतिक महिला दिन आई माता मंदिरासमोरील मंगल कार्यालय, सेक्टर 5 खारघर येथे सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा व गायन स्पर्धा तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम स्नेहभोजनासह आयोजित करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत मिताली शारबीद्रे हिला प्रथम, निर्मला यादव राज सुशीला शर्मा यांना द्वितीय तर विजया पाटील यांना तृतीय पारितोषिक मिळाले. गायन स्पर्धेत देवकी भिसे यांना पहिला,शर्वरी राजुरीकर यांना द्वितीय तर विजया ठाकूर यांना तृतीय क्रमांक मिळाला. सर्व विजेत्यांना पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील यांचे सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल मनपाच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महाराष्ट्र प्रदेश सदस्या तथा नगरसेविका दर्शना भोईर, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, चिटणीस गीता चौधरी, चांदणी अवघडे, मोना अडवाणी यांनी विशेष उपस्थिती लावली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खारघर-तळोजा मंडल अध्यक्षा वनिता पाटील, सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम व आशा बोरसे, कोषाध्यक्ष वैष्णवी शिंदे, चिटणीस योगिता कडू, उपाध्यक्ष अनिता जाधव, उमेरा खान, राजश्री नायडू, स्मिता आचार्य, चिटणीस मधुमिता जेना, श्यामला सुरेश, अंकिता वारंग, आशा शेडगे, अश्विनी भुवड, नीलम विसपुते, कांचन बिर्ला, अनु अन्सारी, स्नेहल बोधाइ, दुर्गा बन्सल, शोभा मिश्रा, विजया पाटील, विजया ठाकूर या महिला पदाधिकार्‍यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply