पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी शनिवारी (दि. 20) भेट देत नागरिकांना देण्यात येणार्या कोरोना प्रतिबंधक लसींची व साठवणुकीची माहिती घेतली, तसेच लस घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार 1 मार्चपासून पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड-19 लसीकरणाचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील आठ सरकारी रुग्णालये, तसेच 10 खाजगी रुग्णालयांमध्ये हे लसीकरण चालू आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी उपजिल्हा रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्र येथे जाऊन लसीकरणाचा आढावा घेतला.
या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …