Breaking News

कर्जतमध्ये चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा

कर्जत ः बातमीदार

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्या अंतर्गत कर्जत तालुक्यात असंख्य भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा सुवर्ण दिवस साजरा केला. कर्जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यासाठी डॉ. नरेंद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष वसंत सुर्वे, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य दीपक भालेराव यांच्यासह भगवान जाधव, सचिव गायकवाड, तालुका उपाध्यक्ष रायगडभूषण किशोर गायकवाड, युवा उपाध्यक्ष किशोर जाधव, शहर सचिव सुनील सोनावणे, अशोक गायकवाड, गायिका रेश्मा सोनावणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply