Breaking News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; खारघरमधील सेंट्रल पार्क बंद

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये खारघर नोडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

खारघर येथील सेंट्रल पार्क हे सुमारे 100 एकर परिसरात पसरलेले भव्य असे उद्यान आहे. या ठिकाणी रोज नवी मुंबई, कामोठे, कळंबोली येथील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा होत असते. खारघर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य स्थितीत खारघरमध्ये 485 विद्यमान कोरोनाचे रुग्ण आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारपर्यंत 1435 विद्यमान रुग्ण आहेत 

खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक फिरायला येत असल्याने त्याठिकाणी गर्दी वाढत आहे. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply