धाटाव : प्रतिनिधी
वरिष्ठ पोलीस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी खंडणीखोर गृहमंत्र्यांचा भाजपच्या वतीने जाही निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली रोह्यामध्ये खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
गृहमंत्री देशमुख यांची राज्यमंत्री मंडळातून मुख्यमंत्र्यांनी हक्कलपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भातील पत्र रोहा पोलीस स्टेशन येथे भाजपच्या वतीने देण्यात आले.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग, माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, रोहा शहर अध्यक्ष वसंत शेलार, जयश्री भांड, विप्रा फाटक, श्रद्धा घाग, नरेश कोकरे, राजेश डाके, निलेश धुमाळ, महावीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.