पनवेल : प्रतिनिधी
चिऊताई ये दाणा खा पाणी पी आणि भुरकन उडून जा… हे गाणे आपल्या आईच्या तोंडून अनेकदा ऐकले आहे, पण दुर्दैवाने जंगल तोडीमुळे चिमण्यांचा निवारा नष्ट होत असल्यामुळे याच चिमण्या दिसेनाश्या होत चालल्या आहेत. तेव्हा त्यांना आणि इतर पक्ष्यांनासुद्धा वाचवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी पनवेल रोटरीने प्रयत्न सुरू केल्याची माहिती श्यामला कुलकर्णी यांनी दिली. यासाठीच रोटरी, रोट्रॅक्ट, इन्टेरेक्ट क्लब्स ऑफ पनवेल महानगर, उसर्ली गावदेवी महिला मंडळ तसेच जिल्हा परिषद शाळा, उसर्ली यांनी सर्वांनी मिळून प्लॅस्टिक बाटल्या, कंटेनर, खोके वगैरे निरूपयोगी वस्तूंपासून विविध प्रकारचे फूड व वॉटर फीडर प्रेसिडेंट श्यामला कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बनविले आहे. हे फूड व वॉटर फिडर पनवेल येथे झाडांना टांगून पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय करून त्यांना वाचविण्यासाठी छोटासा प्रयत्न जागतिक चिमणी दिवशी करण्यात आला. या वेळी प्रेसिडेंट इलेक्ट रवींद्र नाईक आणि सुनीता चौधरी यांनी चिमण्या आणि इतर पक्ष्याबद्दल छान माहिती सांगितली. या कार्यक्रमाला आयपीपी अविनाश कोळी, प्रेसिडेंट श्यामला, प्रेसिडेंट नॉमिनी मुकुंद, पर्यावरण डायरेक्टर अलका, विजय, मंगल, तसेच सोहम, साहिल, राज, श्रेयस, कृष्णा, दिव्या, भूषण, ललित, तसेच गावेदेवी समाजसेविका दीपा भगत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती म्हात्रे, आंबुर्ले जाधव आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहून जागतिक चिमणी दिवस साजरा केला.