Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना 700 पुरण पोळ्यांचे होणार वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर-गरिबांना व गरजूंना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे. 

होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी, अशी संकल्पना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना सुचली. त्यानुसार गेल्या 3 वर्षांपासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते.

होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते, तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रमदेखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते, तर दुसरीकडे अनेक गोरगरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवूनच राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  ज्यांना कोणाला पुरणपोळी दान करण्याची इच्छा असेल त्यांनी 9987733987, 9220403509 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply