पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे दिवंगत नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे शनिवारी (दि. 27) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत संजय भोपी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉल येथे आयोजित शोकसभेत भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, नगरसेवक एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, अनिल भगत, समीर ठाकूर, राजू सोनी, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, अजय बहिरा, नगरसेविका सीता पाटील, रूचिता लोंढे, राजश्री वावेकर, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरिश मोकल, आनंदी ग्रुप खांदा कॉलनीचे रमाकांत भगत, शिवसेना उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, लक्ष्मण साळुंखे, काँग्रेसचे मोहन गायकवाड, मनसेचे अतुल चव्हाण आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिवंगत नगरसेवक संजय भोपी यांना श्रद्धांजली अर्पण करून भोपी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …