खारघर : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांचा रयल सुपर वुमन हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलच्या उपाध्यक्ष आणि भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष बिना गोगरी या शाश्वत फाऊंडेशनच्या सुध्दा अध्यक्षा आहेत. या तिन्ही माध्यमातून त्या सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात अग्रेसर असतात. त्यांच्या या योगदानामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात त्या सर्वपरिचित आहेत. नुकतीच त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन पनवेलमधील एक नामांकित आणि 75 वर्षे जुनी असलेली सामाजिक संस्था, हालिमाबाई झुलेवाली ट्रस्टने त्यांना, 2021 चा रियल सुपर वुमन हा पुरस्कार देऊन गौरविले आहे. समाजासाठी विशेष योगदान देणार्या महिलांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणार्या या संस्थेचे अध्यक्ष मो. हानिफ कच्च्छी आणि सलमा कच्च्छी यांनी बिना गोगरी यांना नुकतेच हा पुरस्कार देऊन गौरविले.