उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील अजिवन अध्ययन व निरंतर शिक्षण विस्तार विभागाच्या वतीने 22 ते 27 मार्च या कालावधीमध्ये यूटोपिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. के. ए. शमा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्द्याटन करण्यात आले. या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये शक्य असल्यास टाईप करून दाखवा, शोधुन दाखवा, रिल्स व्हिडिओ, हे माझे कॉलेज, शेअर मार्केट स्पर्धा, केक स्पर्धा, व्यावसायिक नवीन कल्पना, हस्तकला, पोस्टर मेकिंग, लॉकडाऊनचे फायदे व तोटे यावरचे मत अशा विविध व नाविण्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवारी (दि. 27) स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या महोत्सवात प्राचार्य के. ए. शामा सर, डीएलएल समन्वयक प्रा. व्हि. एस. इंदूलकर, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी विद्यार्थ्यांचा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवाची सर्व थीम ही टीवाय अकाऊन्टिंग आणि फायनान्सचा विद्यार्थी उमर पटेल यांची होती. या महोत्सवाचे समन्वयक म्हणून प्रा. रियाज पठाण व प्रा. हन्नत शेख यांनी काम केले. पारितोषिक वितरणाचे संचलन हुसेन हफिक खान यांनी केले. या वेळी प्रा. एच. के. जगताप, प्रा. ए. के. गायकवाड, प्रा. डॉ. एम. जी. लोणे, प्रा. अनुपमा कांबळे, प्रा. लिफ्टन कुमारी, प्रा. श्वेता गुप्ता आदी उपस्थित होते.