Breaking News

खोपोली पालिकेचे चिंचवली प्रभागाकडे दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी

नगरपालिका हद्दीतील लव्हेज, चिंचवली प्रभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिक नगरसेवक आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

लव्हेजमध्ये रेल्वे स्टेशन असून, तेथे आजूबाजूच्या अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि कामगार रेल्वेने प्रवास करण्यासाठी येत-जात असतात. येथील रस्तेच खड्ड्यात गेल्याने सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवकही लक्ष देत नसल्याने, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी नाराजी व्यक्त करीत पालिकेविरोधात आंदोलनाची तयारी केली आहे.

लव्हेज, चिंचवली शेकीन, श्रीराम नगर, उदय नगर, सरस्वती नगर, शेडवली इत्यादी भागात मोठी लोकवस्ती आहे. मागील चार वर्षांत बांधकामे वाढली आणि यामुळे लोकसंख्याही वाढली आहे. मात्र नागरी सुविधांच्या नावाने बोंबाबोंब आहे. अपुरा पाणी पुरवठा, फुटलेली गटारे, आणि सुलभ शौचालयांची दूरवस्था अशा अनेक नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी असून, मंगेश मोरे यांनी याबाबत स्थानिकांशी चर्चा करून पुढील आठवड्यात नगरपालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply