Breaking News

बारामतीचे पार्सल परत पाठवा : मुख्यमंत्री

महायुतीची कामोठ्यात दणदणीत सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त

यंदाची लोकसभा निवडणूक साधी नाही. ती देशाच्या अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे बारामतीचे पार्सल परत पाठवून मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करा. म्हणजे देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ताकद मिळेल आणि मग जागतिक पातळीवर कुणीही आपल्या भारताला रोखू शकणार नाही, असे खणखणीत प्रतिपादन महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 23) कामोठे येथील विराट जाहीर सभेत केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठ्यातील नालंदा बौद्धविहारासमोरील मैदानात जबरदस्त सभा झाली. या सभेला प्रमुख मान्यवर म्हणून केंद्रीय मंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी, रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, राजेंद्र पाटील, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, युवा नेते के. के. म्हात्रे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. रणरणत्या उन्हातही सभेला तुफान गर्दी लाभली. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply