Breaking News

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार असून त्यासाठी भारतातून प्रतिभावंत खेळाडूंची निवड होणार आहे. त्यानुसार भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत डेव्हलोपमेंट स्कीम आणि कोड ग्रुप स्कीमसाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची विद्यार्थिनी टेबल टेनिस पटू स्वस्तिका संदीप घोष हिची निवड झाली आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. 05 एप्रिल) स्वस्तिकाचे अभिनंदन करून तिला पुढील यशस्वी वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.
यावेळी  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, क्रीडा शिक्षक डॉ. विनोद नाईक, स्वस्तिकाचे वडील संदीप घोष उपस्थित होते.
जागतिक दर्जाच्या खेळाडूंची असलेली ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस देशात होणार आहे. पूर्वी या स्पर्धेत एखाद दुसरे पदक आपल्या देशाला प्राप्त व्हायचा. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा विभागाला बळ देण्याचे काम केले आणि ऑलम्पिक मध्ये भारताने कामगिरीचा आलेख उंचविला. तसेच ’खेलो इंडिया युथ गेम’ उपक्रमातून देशातील प्रतिभावंत खेळाडू उदयास आले. त्याचप्रमाणे स्वस्तिका घोष ने सुद्धा ’खेलो इंडिया युथ गेम’ या टेबल टेनिस राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केली होती. स्वस्तिकाने प्राथमिक शिक्षणापासूनच टेबल टेनिस मध्ये सहभाग घेतला असून सातत्याने सराव आणि त्या अनुषंगाने मेहनत घेतली, त्यामुळे तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने दैदिप्यमान कामगिरी केली.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलमध्ये स्वस्तिकाने इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर आता ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात (स्वायत्त) बीएमएसचे प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. स्वस्तिकाने देशात व परदेशात झालेल्या टेबलटेनिस स्पर्धेत चमकदारी कामगिरी करीत देशाचे नाव उंचाविले आहे. हाँगकाँग, स्पेन, जॉर्डन, कोलंबो, फ्रांस यांसह इतर देशामध्ये झालेल्या स्पर्धेत स्वस्तिकाने अजिंक्यपद पटकाविले आहे.  स्वस्तिकाने लहानपणापासून टेबलटेनिस खेळात आपली आवड व नैपुण्य दाखविले आहे.  त्यामुळे तीला ’विराट कोहली फाऊंडेशन’ कडून स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. ती भारतातील एकमेव टेबल टेनिस खेळाडू आहे, जी या संस्थेद्वारे स्कॉलरशिपसाठी निवडली गेली आहे.  स्वास्तिकाचे वडील संदीप घोष हे या खेळातील प्रशिक्षक आणि सल्लागार आहेत. ओमान येथे झालेल्या ’ओमान ओपन’ स्पर्धेत भारतीय कर्णधार म्हणून यशस्वी जबाबदारीही स्वस्तिकाने पार पडली, त्यावेळी या स्पर्धेत तीने कांस्य पदक मिळविले आणि पदक मिळविणारी भारताची एकमेव खेळाडू ठरली. स्वस्तिकाने 2013 मध्ये गुजरातमध्ये राष्ट्रीय रँकिंग सेंट्रल झोन टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी तिने आपल्या खेळातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती दाखविली आहे.  दोन वर्षांपूर्वी पुणे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या स्पर्धेतही स्वस्तिकाने सुवर्णयश कामगिरी केली. केंद्र शासनाच्या विविध क्रीडा प्रकार असलेल्या ’खेलो इंडिया युथ गेम’ या स्पर्धेतही तिने नेत्रदिपक कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे  ’82 व्या ज्युनिअर अँड युथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2020’ राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदाचा ’किताब जिंकले. स्वस्तिका घोषने आपल्या खेळात सातत्य ठेवले आहे त्यामुळे सध्या ती ऑल इंडिया महिला खुल्या गटातील रँकिंगमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.  भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर स्पोर्ट्सच्या वतीने टार्गेट ऑफ ऑलिम्पिक पोडियम अंतर्गत डेव्हलोपमेंट स्कीम आणि कोड ग्रुप स्कीमसाठी महाराष्ट्रातून दोन तर देशातून सात खेळाडूंची निवड झाली आहे. स्वस्तिकाच्या चमकदार कामगिरीमुळे तिचा समावेश झाला आहे.  मिशन ऑलिम्पिक 2024 अनुषंगाने स्वस्तिका जागतिक दर्जाचा सराव आणि पूर्व तयारी करण्यासाठी ऑस्ट्रिया देशात जाणार असून तिला चीन देशातील सुप्रसिद्ध प्रशिक्षक युन जुन लिव्ह यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.  तसेच तिला दरमहा 25 हजार रुपयांची शिष्यवृत्तीसुद्धा मिळणार आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी  सातत्याने सर्वोत्तपरी मदत केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून स्वस्तिकाला सरावासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इनडोअर हॉल उपलब्ध करून दिला असून गेल्या तीन वर्षांपासून वातानुकूलित इनडोअर हॉल दिला आहे. तसेच प्रशिक्षणासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून आर्थिक मदत, तसेच मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे मी तिचा पालक आणि प्रशिक्षक असलो तरी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच महाविद्यालयाचे आभार मानतो.
-संदीप घोष, स्वतिकाचे पालक व प्रशिक्षक

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply