मुंबई ः प्रतिनिधी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)साठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल कोरोना चाचणीत निगेटिव्ह आला आहे. 22 मार्चला घेतलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आला होता.
बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार देवदत्तला कोरोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते, परंतु आता तो संघात सहभागी होईल. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, देवदत्त 9 एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध होणार्या पहिल्या सामन्यातही तो खेळू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आपला पहिला सामना गतविजेत्या मुंबईविरुद्ध खेळणार आहे. गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीसाठी फलंदाजी करताना त्याने जबरदस्त कामगिरी केली. मागील वर्षी देवदत्तने 15 सामन्यांत 5 अर्धशतकांसह 473 धावा केल्या. त्यामुळे तो या हंगामात पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहिला, तर आरसीबीसाठी मोठा दिलासा असेल.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper