पनवेल : रामप्रहर वृत्त
रशिया येथे 15 ते 21 एप्रिल रोजी वर्ल्ड युनिफाइट चॅम्पियनशीप होणार आहे. यासाठी युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशनच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वेश्वी येथील पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मीडियम स्कूलमधील प्रांजल पाटील या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रांजलला शुभेच्छा दिल्या.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रांजल पाटीलने सहभागी होऊन उत्तम कामगिरी करीत वर्ल्ड युनिफाइट स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रांजलचे अभिनंदन केले आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी यूएसकेएचे अध्यक्ष मंदार पनवेलकर, प्रशिक्षक सागर कोळी, सुरज टकले, स्वप्नाली सणस, प्रांजलचे वडील सचिन पाटील, लक्ष्मण गावंड आदी उपस्थित होते.