पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 14 मध्ये झालेली विकासकामे आणि ’लाडकी बहीण’ योजनेचा मिळालेला लाभ पाहता, यंदा मोठ्या खांद्यातून महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. प्रभाग 14 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते.
मोठा खांदा, धाकटा खांदा गाव आणि परिसरातील नागरी सुविधांची कामे महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. कोविड काळातील केंद्राची ’जनधन’ आणि ’मोफत शिधा’ योजना तसेच ’लाडकी बहीण योजना’ यामुळे नागरिक महायुतीवर खुश आहेत.
लाडकी बहीण योजना बंद पडेल अशी अफवा विरोधकांनी पसरवली, मात्र ती आजही सुरू आहे. काँग्रेसला जनहित बघवत नाही, त्यामुळे महिला मतपेटीतून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देतील. प्रत्येक घरात कमळ निशाणी पोहोचली असून मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. प्रभाग 14 मधील महायुतीचे उमेदवार इक्बालभाई काझी, सारिका भगत, रेणुका नेतकर आणि सतीश पाटील यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली होती.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper