मुंबई ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. राज्य सरकारच्या गलथानपणामुळे कोरोना लसीचे पाच लाख डोस वाया गेले आहेत. त्यास जबाबदार कोण, असा सवाल करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्रात अद्याप 23 लाख कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यांचा योग्य वापर करावा. तोपर्यंत केंद्र सरकार आणखी डोसचा पुरवठा लवकरच करणार आहे. महाराष्ट्राला लागेल तेवढी लस केंद्र सरकार देणार आहे. लसीचा तुटवडा जाणवणार नाही, असे आठवले म्हणाले.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …