पीएफआयच्या सचिवासह तिघांना अटक
पनवेल : वार्ताहर
बंदी घालण्यात आल्यानंतरही पनवेलमध्ये पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालाचाली सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 20) महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली असून सचिवांसह तिघांना अटक केली आहे.
पनवेलमधून पीएफआय पनवेलचे सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद यांच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि तन्वीर हमीद खान यांना एटीएसने अटक केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे. असे असतानाही पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालाचाली सुरूच आहेत. पनवेलमध्ये पीएफआय संघटनेची बैठक झाल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली आहे.
सप्टेंबर महिन्यापासूनच पीएफआयशी संबंध असलेल्यांवर एटीएस व एनआयएकडून कारवाया सुरू आहेत. देशभरात छापे टाकण्यात आले आहेत. पीएफआयशी संबधित ठिकाणांवर छापे टाकून शेकडो जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाने पीएफआयवर पाच वर्षांची बंदी आणली आहे. पीएफआयसोबतच आणखी नऊ संघटनांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. पनवेलमध्ये पीएफआय संघटनेची बैठक झाल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र एटीएसने पनवेलमध्ये कारवाई केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper