Breaking News

बेपत्ता मुलगी रेल्वे पोलिसांकडून कुटुंबीयांकडे सुपूर्द

पनवेल : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील दिघा ऐरोलीमधून हरवलेली अदिक्षा तिकीट तपासणीस दक्षतेमुळे पहाटे मडगाव जाणार्‍या कोकण कन्यामध्ये सापडली. पनवेल रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षक रेणू पटेल यांनी तिला सोमवारी (दि. 12) तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. रेल्वे सुरक्षा बलाच्या पनवेल येथील कार्यालयात आपल्या आईला पाहतच 15 वर्षाच्या अदिक्षाने आईला जाऊन मारलेली मिठी पाहताच तेथील सार्‍यांचे डोळे पाणावले. अदिक्षा नंदू घडशी ही ठाणे जिल्ह्याती दिघा ऐरोली येथील 15 वर्षीय मुलगी रविवार (दि.11) सकाळी 10 वाजता ड्रॉईंग पेपर आणण्यासाठी बाहेर गेली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. सोमवारी पहाटे 1.40 वाजता कोकण कन्या गाडीत तकीट तपासणीस कल्पेश कापसे यांना ठाणे ते पनवेल प्रवासात एक मुलगी विना तिकीट, सोबत कोणी ही नाही जवळ कोणतेही सामान नाही, अशी दिसून आल्याने त्यांनी त्या गाडीतून पनवेलला येणार्‍या रेल्वे सुरक्षा बलाचे हेड कॉन्स्टेबल सरदार सिंह, महिला पोलिस सोनू कुमारी तथा हंसवती मलावी आणि पोलीस हवालदार प्रमोद कुमार यांच्या ताब्यात तिला दिले. त्यांनी तिला पनवेल रेल्वे स्टेशनवरील रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षक रेणू पटेल यांच्या ताब्यात तिला दिले. या मुलीच्या डोक्यावर परिणाम झालेला असल्याने ती चौकशी केल्यावर फक्त आपले नाव अदिक्षा नंदू घडशी असे सांगत होती. अखेर तिला बालसुधारगृहात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यांनी मुलीची मेडिकल झाल्याशिवाय दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली. सोमवारी सकाळी उप जिल्हा रुग्णालयात तिची मेडिकल करण्यात आली. त्यानंतर  कोकण कन्या गाडीचे तिकीट तपासणीस कल्पेश कापसे यांनी फेसबुकवर या मुलीची हरवल्याची माहिती असून त्यात तिच्या पालकांचा फोन नंबर असल्याची माहिती रेणू पटेल यांना दिली. त्यांनी फेसबुकवर तिचा फोटो पाहून खात्री केल्यावर दिलेल्या नंबरवर फोन केला असता नयना घडशी यांनी आपली मुलगी अदिक्षा कालपासून हरवली असल्याचे सांगितले. त्यांना पनवेल येथे बोलावून घेण्यात आले. नयना घडशी यांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर दोन ते तीन महिन्यांपासून परिणाम झाला असल्याचे सांगितले नंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तिला आईच्या ताब्यात देण्यात आले. तिच्या आईने तिकीट तपासणीस कल्पेश कापसे, रेल्वे सुरक्षा बलाच्या उप निरीक्षक रेणू पटेल व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले. 

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply