उरण : वार्ताहर
कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत महाराष्ट्र व पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सादर केलेल्या आदेशाची अवहेलना करून दुकानात गिर्हाईकांची गर्दी करून जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याचा आदेश असताना थंडपेयाची विक्री करीत असताना मिळून आला तसेच किराणा दुकानात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध असताना लोकांची सुरक्षितता धोक्यात घालून विक्री करीत असताना मिळून आला असून त्यांनी शासकीय आदेशाची अवहेलना केला तसेच पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे कडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 24) उरण शहरातील बालई रोडवरील सह्याद्री वाईन शॉपच्या शेजारी असलेल्या मथुरा प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत महाराष्ट्र व पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सादर केलेल्या आदेशाची अवहेलना करून दुकानात गिर्हाईकांची गर्दी करून जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली. आदेश असताना थंडपेयाची विक्री करीत असताना मिळून आला तसेच किराणा दुकानात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध असताना लोकांची सुरक्षितता धोक्यात घालून विक्री होत असल्याने शासकीय आदेशाची अवहेलना केल्याने उरण पोलिसांनी त्या दोघा दुकानदारांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.