नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
संगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या कलादर्पण या संस्थेचा गाण्याचा कार्यक्रम झाला. ये मोह मोह के धागे या शीर्षकाने करावके गाण्याचा हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कलाकारानी घरातून गाण्याचा आनंद घेतला. प्रसिद्ध संगीतकार विजय मनोहर यांनी कार्यक्रमाचे संकलन व तंत्रसहाय्य केले. त्याना अॅड. अतुल जोशी यांनी सहकार्य केले.
श्रुती सिंग, डॉ. शिल्पा वैशंपायन, डॉ. अंजली टकले, डॉ. चित्तरंजन, शिल्पा व अनुष्का भिडे, भारती देशपांडे, प्रसाद जोशी, रेणुका दलाल आदी कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक मोहन हिन्दुपूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.