Breaking News

मतदानाचा हक्क बजावून सुटीचा आनंद लुटा ; डॉ. विजय सूर्यवंशी यांचे पनवेल, उरण, कर्जतमधील मतदारांना आवाहन

अलिबाग : जिमाका

सुटी परत परत येईल, पण मतदानाची संधी 5 वर्षानंतर येणारी आहे, त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा बहुमूल्य हक्क बजावा, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पनवेल, उरण आणि कर्जतमधील मतदारांना केले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 11 लाख 9 हजार 250 मतदार आहेत. मावळमध्ये एकूण 21 उमेदवार निवडणूक लढवीत असून, त्या ठिकाणी सोमवारी (दि. 29) मतदान घेण्यात येणार आहे.

मतदारांना केलेल्या आपल्या आवाहनात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणतात की, मुंबईच्या अगदी जवळ पनवेल, उरण आणि पुण्याजवळ असलेल्या कर्जत, खोपोली भागातील  सर्व मतदार सुजाण आहेत, सुशिक्षित आहेत. मतदानाचे महत्त्व त्यांना ठाऊक आहे, त्यामुळे एक जबाबदार, नागरिक म्हणून त्यांनी आपली ओळख सिद्ध करावी आणि हा राष्ट्रीय महोत्सव साजरा करावा.

-मतदार

मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन विधानसभ मतदारसंघात मिळून 11 लाख 9 हजार 250 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 5 लाख 77 हजार 180 आणि महिला 5 लाख 32 हजार 67 आणि तृतीयपंथी 3 आहेत.

-मतदारसंघनिहाय मतदार

पनवेल 5 लाख 39 हजार 187,

उरण 2 लाख 90 हजार 273,

कर्जत 2 लाख 79 हजार 790

-274 सर्व्हिस व्होटर्स

पनवेलमध्ये 170, उरणमध्ये 41, आणि

कर्जतमध्ये 63 मिळून एकूण

274 सर्व्हिस व्होटर्स आहेत.

-1266 मतदान केंद्र

या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 1266 मतदान केंद्र आहेत. त्यातील पनवेलमध्ये 584, उरणमध्ये 339, कर्जतमध्ये 343

-क्रिटीकल मतदान केंद्र

पनवेलमधील 10 मतदान केंद्र व उरणमधील 3 मतदान केंद्र ही क्रिटीकल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित करण्यात आलेले आहेत. पनवेलच्या 10 पैकी 7 मतदान केंद्र खारघरमधील आहेत.

-संवेदनशील 5

उरण भागातील गव्हाण येथील 5            

मतदान केंद्र संवेदनशील म्हणून

जाहीर करण्यात आली आहेत.

-मतदानासाठी 11 ओळखपत्र पुरावे

मतदान ओळखपत्र नसले, तरी मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी विविध 11 कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. त्यात पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना,  आस्थापनांचे ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन, रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, आरोग्य कार्ड, निवृत्त कर्मचार्‍यांचे पेन्शन पासबुक किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर, आमदार किंवा खासदार यांचे ओळखपत्र आणि आधार कार्ड.

-पुरेशी मतदान यंत्र

निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध आहेत. एकूण राखीव यंत्र मिळून बॅलेट युनिट्स 2916, कंट्रोल युनिट्स 1454, व्हीव्हीपॅट 1568 असतील. ही मतदान यंत्र ने-आण करणार्‍या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे.

-132 ठिकाणांहून वेब कास्टिंग

पनवेल मधील 58, उरणमधील 39, कर्जतमधील 35 मतदान केंद्रांवरून वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply