Breaking News

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई ः प्रतिनिधी
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सीबीएसई बोर्डाकडून 4 मे ते 14 जून या कालावधीत दहावीची परीक्षा घेतली जाणार होती, मात्र ती रद्द करण्यात आली आहे. ऑब्जेक्टिव्ह निकषांच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील आणि त्यांना गुणपत्रिका दिल्या जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार गुण दिले जाणार आहेत. एखादा विद्यार्थी याबद्दल समाधानी नसल्यास त्याला परीक्षा देण्याची संधी मिळेल.
बारावीची परीक्षादेखील 4 मे ते 14 जून याच कालावधीत होणार होती, मात्र ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. 1 जूनला आणखी एक बैठक होईल. त्यात त्या वेळच्या कोरोना स्थितीचा
आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल. परीक्षा होणार असल्यास त्याबद्दलची सूचना विद्यार्थ्यांना 15 दिवस आधी दिली जाणार आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply