Breaking News

‘रेमडेसिवीर’ची किंमत होणार कमी; काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

गेले काही दिवस रेमडेसिवीर औषध बरेच चर्चेत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या या औषधाचा तुटवडा जाणवतो आहे, हे औषध वाढीव दराने विकले जात आहे, या औषधाचा काळाबाजार केला जात आहे. दरम्यान, आता याच औषधाबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याचा तसेच त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग  (स्वतंत्र प्रभार) आणि रसायन आणि खते, मंत्री मनसुख मांडवीय यांनी 12 आणि 13 एप्रिला, 2021 रोजी रेमडेसिवीर औषधाचे सर्व उत्पादक आणि इतर हितधारकांबरोबर बैठक घेतली. या औषधाच्या उपलब्धतेच्या समस्येचा आढावा घेतला आणि मग हा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरच्या सात उत्पादकांची सध्याची स्थापित क्षमता दरमहा 38.80 लाख कुपी इतकी आहे. सहा उत्पादकांना दरमहा 10 लाख कुपी  उत्पादन क्षमता असणार्‍या सात अतिरिक्त जागांसाठी  जलदगतीने मंजुरी देण्यात आली आहे. दर महिन्याला आणखी 30 लाख कुप्याचे उत्पादन लवकरच सुरू होईल. यामुळे महिन्याला सुमारे 78 लाख कुप्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढीस लागेल. औषध महानियंत्रकांनी राज्ये आणि केंद्र सरकारच्या अंमलबजावणी प्राधिकरणांना रेमडेसिवीरचा काळा बाजार, साठवणूक आणि वाढीव दर आकारण्याच्या घटनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी (एनपीपीए) रेमडीसीवीरच्या उपलब्धतेवर सातत्याने देखरेख ठेवत आहे.

पुरवठ्यास प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी स्वेच्छेने या आठवड्याच्या अखेरीस  3500 रुपयांहून कमी केली आहे. रुग्णालय, संस्था पातळीवरील पुरवठा पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश रेमडीसीवीरच्या उत्पादनांना देण्यात आले आहेत.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply