Breaking News

भाजप युवा मोर्चातर्फे दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 21) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा येथे महाराजांना अभिवादन करून करण्यात आले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, ज्येष्ठ कार्यकर्ते शांताराम महाडिक, युवा नेते संजय जैन, गौरव कांडपिळे, चिन्मय समेळ, केदार भगत, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, विवेक होन, शावेज रिझवी, आत्मनिर्भर भारतचे रायगड जिल्हाध्यक्ष आकाश भाटी, नूतन पाटील यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नाव नोंदणीची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रोहित जगताप (8691930709), अजिंक्य भिडे (8850644207), देवांशू प्रभाळे (8433513540) किंवा अनिकेत भोईर (9930104499) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेची पारितोषिके : दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित भव्य किल्ले स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सात हजार रुपये, तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे पाच हजार व तीन हजार रुपये असून एकूण 30 हजार रुपयांची 20 उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. एकूण विजेत्यांना 45 हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषकने सन्मानित करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

युवा मोर्चाच्या वतीने दरवर्षी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ल्यांचा इतिहास तरुणांसह लहान मुलांना अवगत केला जातो. दिवाळीच्या सुटीत अभ्यासाला सुटी असते, मात्र अशा स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास आणि संस्कृती जपण्याचे काम होत असते. या आयोजनाबद्दल युवा मोर्चाचे अभिनंदन!
-आमदार प्रशांत ठाकूर

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply