Breaking News

अलिबागेत वीकेण्ड लॉकडाऊन इतर दिवशी अत्यावश्यक दुकाने

दुपारी 1 वाजेपर्यंतच खुली राहणार

अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलिबाग नगर परिषद प्रशासनाने शनिवार, रविवारी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. अन्य दिवशीदेखील दुपारी 1 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता राहणार आहेत. या सदंर्भात पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि पालिका यांची संयुक्त बैठक झाली.
अलिबाग शहर व परिसरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव जलद गतीने होताना दिसतो आहे. दिवसाला शंभरहून अधिक रुग्ण रोज आढळून येत आहेत. पनवेल महापालिकेनंतर दररोजच्या रुग्णवाढीत अलिबाग तालुक्याचा नंबर लागतो. शुक्रवारी (दि. 16) 111 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये संचारबंदीत सूट मिळालेल्या काही दुकानादारांमुळेच गर्दी होत असल्याबाबत चर्चा झाली. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने सोमवार ते शुक्रवार भाजी मार्केट, फळमार्केट, मच्छीमार्केट, हातगाड्या व परिसरातील चिकन-मटण सेंटर दुपारी 1 वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 1 वाजल्यानंतर यातील कुठलेही दुकान उघडे ठेवता येणार नाही, तर तर शनिवार व रविवार या दिवशी केवळ वृत्तपत्र, डेअरी, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स व टेस्टिंग लॅब या आस्थापना वगळता सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply