Breaking News

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 64 अर्ज दाखल

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

तालुक्यातील तिवरे आणि वरई या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत. या दोन ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच पदासाठी 7 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. तर ज्या दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुक होणार आहे तेथे प्रत्येकी एक उमेदवार असल्याने त्या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुक बिनविरोध होणार आहे.

कर्जत तालुक्यातील वरई आणि तिवरे या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि 18 जागांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. वरई या ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद सर्वसाधारण असून तेथे थेट सरपंच पदासाठी 5 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. या ग्रामपंचायतीतील  सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी 29 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

तिवरे ग्रुपग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असून, त्या जागेसाठी केवळ दोन उमेदवारी अर्ज  दाखल झाले आहेत. तेथील सदस्यपदाच्या नऊ जागांसाठी  28 अर्ज दाखल

झाले आहेत.

कर्जत तालुक्यातील हुमगाव आणि जामरुंग या दोन ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या प्रत्येकी एक सदस्य पदांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. मात्र तेथे केवळ एक एक नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे तेथील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दाखल झालेल्या थेट सरपंच पदाच्या सात अर्जांची आणि दोन ग्रामपंचायतीमधील 18 जागांसाठी 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी शुक्रवारी (दि. 22)  कर्जत तहसिल कार्यालयात होणार आहे. तर 25 नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply