Breaking News

उपजिल्हा रुग्णालयाचा पनवेलकरांना मोठा आधार

खारघर, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर

पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय सध्याच्या घडीला कोविड रुग्णांना मोठा आधार ठरत आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी एस लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण डॉक्टर्स, नर्स तसेच इतर कर्मचारी कोविड रुग्णांची सेवा करीत असून मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात उपजिल्हा रुग्णालयात आहेत.

120 खाटांची क्षमता या उपजिल्हा रुग्णालयात आहे, तरीदेखील सुमारे 150 पेक्षा जास्त रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णाला भरतीसाठी संपर्क साधल्यास त्याठिकाणाहून वारंवार जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जाते, मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत ज्यादाच्या 30 पेक्षा जास्त रुग्णांवर बिनासबब उपचार केले जात आहे. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार झाल्यावर त्याला किमान दोन लाखांपेक्षा जास्तीचे बिल या रुग्णालयांना अदा करावे लागते, मात्र उपजिल्हा रुग्णालयात सर्व उपचार मोफत होत असल्याने पनवेलकरांना उपजिल्हा रुग्णालयाचा भक्कम आधार मिळत आहे. सध्या रुग्णालयात इतर डॉक्टर उपलब्ध असले तरी एका एमडी फिजिशियन डॉक्टरची गरज आहे. एकाच एमडी फिजिशियन डॉक्टरकडून रुग्णांची देखभाल केली जाते. 100 सर्वसाधारण आणि 20 ट्रॉमा केअर सेंटरचे बेड असे मिळून 120 खाटांची क्षमता असलेल्या रूग्णालयात सध्या 150 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालायत हजारो रुग्णाचे मोफत उपचार होऊन ते घरी परतले आहेत. याठिकाणी आठ व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे, मात्र उपजिल्हा रुग्णालय पनवेलकरांच्या सेवेत अविरत सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयाला कोविडचा दर्जा मिळाल्यांनतर डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षपदाची यशस्वी दुरा सांभाळली. त्यांना बढती मिळाल्यांनंतर त्यांची पनवेलवरून बदली झाली. त्यांनतर डॉ. बी. एस. लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे रुग्णालयात कोविड रुग्णांची सेवा सुरू आहे. कोविड सारख्या परिस्थितीत युद्धपातळीवर संपूर्ण रुग्णालय स्टाफ रुग्णांची सेवा करीत आहे.

एकीकडे खाजगी रुग्णालयात लाखो रुपये मोजुन कोविडवर उपचार मिळत आहे. त्यातच विनामुल्य रुग्णांना कोविडवर उपचार मिळत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय हे कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी देवदूत ठरत आहेत.

कोविड रुग्णांना वेळेवर उपचार, त्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरविण्याकडे आम्ही लक्ष देत असतो. उपजिल्हा रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण सुखरूप बरा होऊन घरी जावा हीच आमचा इच्छा असते. याठिकाणांहून डिस्चार्ज मिळाल्यावर रुग्ण व त्याच्या नातेवाइकांच्या चेहर्‍यावर पहावयास मिळालेला समाधान हीच आमच्या कामाची पोचपावती आहे.

-डॉ. बी. एस. लोहारे, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply