Breaking News

कोरोनामुळे औषधांची खरेदीही ऑनलाइन

नवी मुंबई : प्रतिनिधी

शहरात अनेक मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी होत असून, त्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही गर्दी टाळण्यासाठी नियमित औषधे घेणार्‍या ग्राहकांनी ऑनलाइन औषधे खरेदीला पसंती दिली आहे.

अनेक लोक आपल्या नेहमीच्या ठरलेल्या औषध दुकानदाराकडून औषधे खरेदी करीत असतात. बहुतांश दुकानदार नेहमीच्या ग्राहकांना बिलात सूट देतात. ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, रक्तदाब या सारख्या व्याधींची औषधे नियमीत लागतात. काही ज्येष्ठ नागरिक दर महिन्याला पेन्शन झाली की ही औषधे घरी घेऊन येतात, मात्र गेल्या दोन महिन्यापासून यात काही ठिकाणी खंड पडला आहे. अनेक मेडिकल स्टोअरमध्ये ज्येष्ठ नागरिक जाण्यास तयार होत नाही. अनेक नागरिकांनी औषधे खरेदी करण्यासाठी मोबाइल अ‍ॅपला पसंती दिली आहे. या अ‍ॅपमध्ये नाव नंबर पत्ता टाकल्यास व डॉक्टरने दिलेल्या प्रिस्क्रिपशचनी कॉपी जोडल्यास हवी ती औषधे या कंपन्या घरपोच देत आहेत.

अ‍ॅपवरून खरेदी केल्यास दुकानादारांपेक्षा कमी किमतीत औषधी मिळत असल्याचे काही रुग्णांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पैसे देखील ऑनलाइन देता येत असल्याने कुणाचाही संपर्क येत नाही. दुकानात जाण्याची इच्छा होत नाही. कोणता रुग्ण कोणते औषध घ्यायला आला हे सांगता येत नाही. त्यामुळे मुलांकडून शिकून ऑनलाइन औषध खरेदी शिकून घेतली आहे. दरमहा तसेच मागवते, असे नंदिनी वरवडकर यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply