Breaking News

तळोजा एमआयडीसीतील कामगारांची अॅण्टीजेन चाचणी

तळोजा : रामप्रहर वृत्त

कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल आणि तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (टीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने तळोजा एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी 15 व 16 एप्रिल रोजी रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टीएमएच्या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावर हे शिबिर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटी-पीसीआर चाचणीसंदर्भात शासनाने 9 एप्रिल रोजी एक परिपत्रक जाहीर केले. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीला परवानगी देण्यात आली असून 10 एप्रिलपासून ही चाचणी अनिवार्य करण्याची सुचना देण्यात आली आहे. या अनुषंगाने टीएमएने पुढाकार घेत कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलच्या सहकार्याने तळोजा एमआयडीसीमधील कर्मचार्‍यांसाठी ही रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण 218 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यातील आठ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply