Breaking News

पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यालगतच्या महाकाय वृक्षांमुळे पावसाळ्यात धोका

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष

पोलादपूर : प्रतिनिधी

येथील पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दूतर्फा महाकाय वृक्ष आहेत. ते वादळवार्‍याने कोसळल्यास पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्यासह छोट्या हातगाड्या आणि टपरीव्यावसायिकांच्या जिवीताला तसेच मालमत्तेला धोका निर्माण होणार आहे. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दूर्लक्ष केले जात आहे.

निसर्ग चक्रीवादळात पोलादपूर – महाबळेश्वर रस्त्यावरील गाडीतळाजवळ एक महाकाय वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प झाली तर अनेक वृक्षांच्या छोट्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या होत्या. तरीही पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनही पावसाळ्यापूर्वी  करण्याच्या कामांचे नियोजन केलेले नाही. पोलादपूर नगरपंचायतीकडूनही या मार्गावरील वाढत्या टपर्‍या आणि हातगाडयांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याकडे डोळेझाक केली जात आहे. येत्या पावसाळयामध्ये पुन्हा वादळी पाऊस झाल्यास  या रस्त्यालगतच्या टपर्‍या, हातगाड्या तसेच इमारतींना धोका निर्माण होऊन जीवितहानी तसेच वित्तहानी होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड येथील कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी तातडीने उपाययोजना करण्याची तत्परता दाखवून पोलादपूर ते महाबळेश्वर या रस्त्याच्या दूतर्फा असलेल्या महाकाय वृक्षांचा धोका कायमचा नष्ट करण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी पोलादपूरमधील नागरिकांकडून केली जात आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply