Breaking News

पेणच्या इनडोअर गेम हॉलमध्ये लसीकरण केंद्र

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा पुढाकार

पेण : प्रतिनिधी

येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची संख्या वाढत असून, येथेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे लसीकरणाला येणार्‍या रुग्णांना संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून, शहरातील इनडोअर गेम हॉल लसीकरणासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिली.

नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, सभापती दर्शन बाफणा, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी इनडोअर गेम हॉलमध्ये लसीकरणासाठी लागणार्‍या सोयी-सुविधांची पाहणी केली. नागरिकांच्या सेवेसाठी पेण नगर परिषदेच्या पुढाकाराने व उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने इनडोअर गेम हॉल येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे या वेळी नगराध्यक्षा पाटील यांनी सांगितले.  

जानेवारीपासून पेण उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणास सुरुवात झाली असून, सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत होती. त्यानंतर 45 वर्षे वयावरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात येणार्‍या नागरिकांची संख्या वाढली आहे. या उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असून तेथे लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांच्या मनात संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. इनडोअर गेम हॉल येथे मंगळवार (दि. 20)पासून लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लसीकरणासाठी येणार्‍या नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप वर नोंदणी करावी. त्यांना नगर परिषदेकडून सहकार्य केले जाईल. शहरातील इनडोअर गेम हॉलमध्ये मंगळवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

-प्रीतम पाटील, नगराध्यक्षा, पेण

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply