Friday , March 24 2023
Breaking News

खारघरमध्ये महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांचा मतदारांशी संवाद

खारघर : रामप्रहर वृत्त

 भाजप-शिवसेना-आरपीआई महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर सेक्टर-13मध्ये प्रचार अभियान राबविण्यात आले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. त्याची चित्रमय झलक या प्रचाराने महायुतीने जोरदार मुसंडी घेतल्याचे दिसून आले. आमदार प्रशांत ठाकूर, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर आणि शिवसेना युवा नेते विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या रॅलीत मनपातील भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते. मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही मतदारांपुढे जात असून, खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठविण्याचा निर्धारही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply