Breaking News

पनवेल शहरात प्रचाराला वेग

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार वेगाने सुरु आहे. श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आवाहन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील शनी मंदिर, रोहिदास वाडा, टपालनाका या परिसरामध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीत पनवेल महापलिकेच्या प्रभाग समिती ड चे अध्यक्ष राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सुलोचना कल्याणकर, संजय जैन, स्वप्निल ठाकूर, युवामोर्चा पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, अंजली इनामदार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply