Breaking News

एपीएमसीतील भाजी आता सर्कस मैदानात

पनवेल : प्रतिनिधी

कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. त्यामुळे खबरदारी म्हणून हा भाजी बाजार खांदेश्वर स्टेशन रोडवरील सर्कस मैदानात शुक्रवारपासून सुरू झाला आहे. उरण नाका परिसरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी भाजी बाजार खांदेश्वर स्टेशन रोडवरील सर्कस मैदानात हालविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवार (दि. 22) रात्री या मैदानावर विक्रेत्यांच्या बसण्याची व्यवस्था तसेच लाईटची सोय करण्यात आली. शुक्रवारी (दि. 23) पहाटे भाजी विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये न जाता सर्कस मैदानामध्ये भाजी विक्रीस आणली होती. या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी स्पीकरवरून घोषणा देण्याची सोयही करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही व्यापार्‍यांना सर्कस मैदानावर बाजार हलविण्यात आल्याची माहिती देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणी गर्दी होऊ नये, बाजाराचे कामकाज व्यवस्थित व्हावे यासाठी सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव तसेच प्रभाग अधिकारी, अरूण कोळी, सदाशिव कवठे, हरिश्चंद्र कडू उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply