Breaking News

सिध्दू हम शर्मिंदा है!

सिध्दू हम शर्मिंदा है. बाबल्या आणि  त्याचे मित्र सोसायटीच्या गेटवर जोरजोरात ओरडत होते. त्यांना थांबवून विचारले, बाबल्या काय झालं? बाबल्या सांगू लागला, तुका माहीत हाय ना आपल्या देशात दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये आपले 40पेक्षा जास्त जवान शहीद झाले. असे असताना या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी पाकिस्तानाबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा सल्ला सिध्दू देतोय म्हणजे त्यांनी काही करायचे आमचे सैनिक मारायचे आणि आम्ही काय बांगड्या भरून बसायच्या? म्हणून आम्ही सिध्दू हम शर्मिंदा है घोषणा देतोय.

खरंय, आपल्या  देशात  धर्मनिरपेक्षतेच्या  नावाखाली ममता, मुलायम, केजरीवाल कंपनीने गोंधळ घातलाय. आपली व्होट बँक राखण्यासाठी ज्यांना लोकांच्यात स्थान  राहिले नाही असे राजकारणी आणि त्यांना साथ देणारे उच्चशिक्षित तथाकथित विचारवंत, साहित्यिक, खेळाडू आणि कलाकार, या देशात देशद्रोह्याला फाशी देऊ नये यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणारे वकील या सगळ्यांमुळे आपल्या देशात दहशतवाद्यांचे फावले आहे. आज 40पेक्षा जास्त वीरपुत्र शहीद झाल्यावर त्यातील काही आपले तोंड लपवून बसले आहेत. काँग्रेसच्या कृपेने एका राज्याचा मंत्री असलेला सिध्दूसारखा डोक्यात हवा गेलेला खेळाडू 14 फेब्रुवारीला दुपारी हा हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असताना पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा सल्ला  देत होता. पुलवामा हल्ल्यानंतर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्याला नेटीजन्सनी झोडपल्यावर अखेर त्याला ’द कपिल शर्मा शो’मधून डच्चू दिला गेला. 

‘माझ्या पतीचं जे अपूर्ण कर्तव्य राहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा मुलगा जगन सीआरपीएफमध्ये भरती होईल’. जम्मू- काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ओडिशामधील जगतसिंहपूर जिल्ह्यातील प्रसन्ना साहूदेखील शहीद झाले. ही बातमी मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, मात्र अशा परिस्थितीही प्रसन्ना साहू यांच्या पत्नी मीना यांनी आपल्या मुलाकडे इशारा करत म्हटलेले ऐकून अनेकांची छाती

अभिमानाने फुलली. आमचा बाबल्या त्याला अपवाद नव्हता.   

शहीद प्रसन्ना सीआरपीएफच्या 61व्या बटालियनमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 1995 रोजी प्रसन्ना सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. प्रसन्ना यांच्या कुटुंबाला गुरुवारी रात्री सीआरपीएफ मुख्यालयातून शहीद झाल्याची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांच्या घरात एकच शांतता पसरली असून सर्वांच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत आहेत. प्रसन्ना यांच्या मागे त्यांची पत्नी मीना आणि दोन मुले आहेत. जगन सध्या बारावीत शिकत आहे, तर बहीण रोनी पदवी शिक्षण घेत आहे. आम्हाला वडिलांचा अभिमान आहे, पण धक्क्यातून सावरता येणं कठीण असल्याची प्रतिक्रिया मुलगी रोनीने दिली आहे. प्रसन्ना यांनी गतवर्षी घर तयार करण्यास सुरुवात केली होती, जे यावर्षी पूर्ण होणार होतं, अशी माहिती त्यांच्या भावाने दिली आहे. हे सगळे शांतपणे बाबल्या ऐकत होता.    

‘नमस्ते भारतीयांनो, काही सीआरपीएफचे जवान शहीद झाले, त्यावर तुम्ही खूप दु:ख व्यक्त करत आहात असं मी ऐकलंय. किती लोक होते ते? 44 असो किंवा 440, तुम्हाला का दु:ख होत आहे? तुम्ही ते करा जे या देशात योग्य मानलं जातं, जे धर्मनिरपेक्षवादी करतात. यांसारख्या घटनांवर शोक, दु:ख व्यक्त करणं हे आरएसएस, बीजेपी, हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी संघटनांवर सोडून द्या. जे धर्मनिरपेक्ष लोक करतात ते तुम्ही करा. जर भारतात राहायचं असेल तर ‘भारत तेरे टुकडे होंगे..अफजल हम शर्मिंदा है,’ असे धर्मनिरपेक्ष विचार तुम्ही ठेवले पाहिजेत. इथे वंदे मातरम् वगैरे बोलणसुद्धा चुकीचे आहे. सीआरपीएफचे जवानच तर शहीद झाले आहेत, यात कोणती मोठी गोष्ट आहे? इथे तर नमस्तेसुद्धा बोलू नका…लाल सलाम, अशा शब्दांत सोनूने ‘धर्मनिरपेक्ष’ भारतीयांवर संतप्त होऊन केलेली बोचरी टीका ऐकल्यावर मात्र बाबल्याला राहवलं नाही. त्याने या तथाकथित नेते आणि नटांचा आपल्या भाषेत उध्दार सुरू केला. 

रियाझ वाणी या तरुणाने या हल्ल्यानंतर काही वेळातच ’अथ वनान सर्जिकल स्ट्राइक’ (याला म्हणतात सर्जिकल स्ट्राइक) अशी फेसबुक पोस्ट लिहिली, तर त्याचवेळी त्याच्या इक्बाल हुसैन यानेही  ’हो हीच खरी सर्जिकल स्ट्राइक आहे’ अशी प्रतिक्रिया त्या फेसबुक पोस्टवर दिली. या फेसबुक पोस्टचा आणि कमेंटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटिझन्सनी या दोघांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी झायडस आणि मॅकलॉड्स या कंपन्यांची नावे घेत तुम्ही अशा कर्मचार्‍यांना कामावर ठेवूच कसे शकता?, असे सवालही विचारण्यात आले. यानंतर या दोन्ही कंपन्यांनी रियाझ वाणी आणि इक्बाल हुसैन या कर्मचार्‍यांना तत्काळ निलंबित केले. खरंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता. अशा लोकांना काँग्रेस सरकारने डोक्यावर चढवल्याचा परिणाम  आज आपल्याला भोगावा लागत असल्याची भावना बाबल्याने व्यक्त केली.

-नितीन देशमुख

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply